आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिखलदर्‍यात दुसर्‍या दिवशीही अतिवृष्टी चालूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलदरा - ‘विदर्भाचे नंदनवन’ अशी ओळख असलेल्या चिखलदरा तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता पूर्ण झालेल्या 24 तासांत या तालुक्यात तब्बल दीडशे मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.
वरुड तालुक्यात 67.87 मिमी, तर धारणी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनुक्रमे 63.07 व 62.01 मिमी. पर्जन्यमान नोंदले गेले. जिल्ह्यात सर्वात कमी 11.40 व 11.80 मिमी पाऊस धामणगावरेल्वे आणि चांदूररेल्वे या तालुक्यांमध्ये कोसळला. नांदगाव खंडेश्वरमध्ये 15, तिवस्यात 17.26, भातकुलीत 27.83 मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथे 31.60 मिमी, तर मोर्शीत 46.34 मिमी पर्जन्यमान नोंदले गेले.
चार दिवसांची झळ : सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हाभर थंड वारे पसरले. अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस अखंडित असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांतील उपस्थिती घटली असून नागरिक अतिशय महत्त्वाच्या कामानिमित्तच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. पावसामुळे बाजारपेठही मंदावली आहे.