आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secret Discussion Between Murli Manohar Joshi And Mohan Bhagwat

मुरली मनोहर जोशी, संघ नेत्यांत खलबते; सुब्रमण्यम स्वामी यांचीही संघ दरबारी हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा अखेरचा टप्पा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी व सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी नागपुरात संघ नेत्यांशी तासभर चर्चा केली. या नेत्यांच्या अचानक दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
उत्तर प्रदेशातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये अजूनही मतदान व्हायचे आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुरली मनोहर जोशी अचानक नागपुरात दाखल झाले. बुधवारी दुपारी त्यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह काही निवडक संघ नेत्यांशी सुमारे तासभर चर्चा केली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी कुठलाही संवाद न साधता जोशी दिल्लीला रवानाही झाले. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, उत्तर प्रदेशातील संभाव्य निकाल तसेच राष्ट्रीय राजकारणावर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.