आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राष्‍ट्रपतींना साकडे घालणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रपतींच्या नागपूर दौ-यात त्यांना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय विदर्भ राज्य कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे विदर्भाच्या आंदोलनास आर्थिक मदत व्हावी, यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रवक्ते राम नेवले यांनी दिली.
समितीची बैठक नुकतीच पार पडली, त्यात राष्ट्रपतींना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये समितीची नेमकी भूमिका ठरवण्यासाठी पाच सदस्यीय राजकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत अ‍ॅड. वामनराव चटप, डॉ. अनिल बोंडे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, दीपक निलावार व राम नेवले यांचा समावेश असून, राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला सोपवण्यात आले आहेत. समितीच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनमत कौल घेण्याची प्रक्रिया सुरू असून, 15 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात जनमताचा कौल घेतला जाणार असल्याची माहिती नेवले यांनी दिली.