आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Separate Vidarbha Movement News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळ्या विदर्भासाठी ‘बंधन’,नागपुरात जनमंचच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता कदापि थांबणार नाही. समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग या आंदोलनात घेण्यासोबतच प्रत्येक वैदर्भीय माणसाला येत्या 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून ‘विदर्भ बंधन’ बांधण्यात येईल,’ असे विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी मांडलेली ही सूचना सर्वांनी उचलून धरली.

जनमंच संघटनेतर्फे रविवारी विदर्भवादी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संविधान चौकात कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाची शपथ घेऊन अधिक संघटितपणे व जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किल्लोर, सल्लागार प्रा. शरद पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

असे राहील बंधन
रंगीबेरंगी देवराख्या सर्वांना माहिती आहेत. परंतु विदर्भाचे बंधन हे रंगीत नसेल, तर पांढरे राहील. विदर्भाचे प्रमुख पीक असलेल्या कापसापासून या देवराखीसारख्या पांढर्‍या राख्या तयार करून त्या 9 ऑगस्टपासून बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन बांधण्यात येईल, असा कार्यक्रम ठरवण्यात आला.

संधी गमावू नका : पाटील
जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील म्हणाले की, ‘वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल वातावरण आहे. आपल्या गाफीलपणामुळे ही संधी गमवायची नाही. आगामी तीन तीन महिने विदर्भ हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे. महाविद्यालयात जाऊन युवकांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देऊ.’

(फोटो - नागपुरातील संविधान चौकात रविवारी जनमंच या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्याची व प्रत्येकाला बंधन बांधण्याची शपथ घेतली. )