आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sevagram Ashram News In Marathi, Mahatma Gandhi, Divya Marathi

‘सेवाग्राम’ने जागवल्या ‘बापूं’च्या आठवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - शांती आणि अहिंसेचा संदेश देणा-या सेवाग्राम आश्रमात 78 वर्षांच्या कालावधीनंतर बापू कुटीच्या दुरुस्तीच्या माध्यमातून पुन्हा ‘बापूं’च्या आठवणी जागवल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामातील प्रथम आगमनाचा आणि बापू कुटीची दुरुस्ती करून ती दर्शनार्थ्यांसाठी खुली करण्याचा दिवस एकच आल्याने हा योगायोग असला तरी यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

30 एप्रिल 1936 मध्ये महात्मा गांधी वर्धा शहरातील वास्तव्य सोडून सेगावला गेले. तेव्हापासून सेगावात आमूलाग्र बदल होऊन सेगावचे नामकरण सेवाग्राम असे झाले. बापूच्या सेवाग्राम आश्रम प्रवेशाला जवळपास 78 वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत बापू कुटीचे छत खराब झाल्याने दुस-यांदा त्याच्या दुरुस्तीचे काम आश्रम प्रतिष्ठानने हाती घेतले होते. 19 एप्रिलपासून बापूंच्याच विचारधारेवर आधारित स्थानिक साधनसंपत्तीच्या आणि कामगारांच्या मदतीने कामाला सुरुवात झाली.