आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sevagram News In Marathi, Mahatma Gandhi, Seva Sangh

गांधीजींच्या सेवाग्राममध्येच अहिंसेला हरताळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही आधारमूल्ये असणार्‍या सर्व सेवा संघ अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान संघाच्या लोकसेवकांनीच गोंधळ घालत मारहाण करून शांतीचे प्रतीक असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसराला गालबोट लावले.


सेवाग्राम आश्रमातील शांती भवनात सर्व सेवा संघाचे 82 वे अधिवेशन आयोजित करण्यात आले. रविवारी सर्व सेवा संघाच्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी 41 लोकसेवकांनी चिठ्ठीद्वारे नावे नोंदविली होती. त्यात महादेवभाई विद्रोही यांचे नाव आघाडीवर होते. पण काहींनी त्यांच्या नावाला विरोध केल्याने प्रक्रि या लांबली. बहुमताने नव्हे तर सर्वानुमते निवड करणे सर्व सेवा संघाची परंपरा आहे मात्र, विद्रोहींच्या नावावर एकमत झाले नाही. परिणामी वाद वाढत गेल्याने प्रक्रिया दुसर्‍या ठिकाणी सुरू करुन शांती भवनात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी राधाबहन भट, विभा गुप्ता, कमलनाथ भाई, डॉ.श्रीराम जाधव, डॉ. सुगण बरंठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. धर्माधिकारी बोलत असतानाच बाजूच्या खोलीत अध्यक्षपदी विद्रोही यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विरोधक गोंधळ घालत समारोपस्थळी आले आणि गोंधळाला सुरुवात केली. काहींनी हाणामारी करून महात्माजींच्या मूल्यांना पायदळी तुडविले. हा सर्व गोंधळ पाहून अनेक गांधीवादी विचारवंत अवाक् झाले. तब्बल अर्धा तास हा हिंसक प्रकार चालला. वातावरण निवळल्यानंतर समारोपीय कार्यक्रम सुरू करण्यात आला.