आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात सेक्स रॅकेट चालवणा-या महिलेस अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूरात सेक्स रॅ‍केट उघडकीस आले आहे. एका आठवीतील मुलीस या क्षेत्रात आणण्‍यासाठी सपना नावाच्या महिलेने त्या मुलीस मारहाण केल्याने ही घटना समोर आली आहे . त्या मुलीने पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर संबंधित महिलेला अटक करण्‍यात आली.

अटक करण्‍यात आलेली महिला ही शहरातील सीएमपीडीआय रोडवर असलेल्या महाबोधी अपार्टमेंटमध्‍ये राहते.किशोरी मंजू ( नाव बदलण्‍यात आले आहे) इयत्ता आठवीत शिकत आहे.शुक्रवारी मंजू ही सपना नावाच्या
महिलेकडे गेली होती.त्या महिलेने आपल्या बरोबर येण्‍याचे मंजूला सांगितले,परंतु त्यास तिने नकार दिल्याने
मारहाण करण्‍यात आले . मंजूने पोलिसांना याबाबत कळवले.पोलिस येई पर्यंत सपना व तिच्याबरोबर
असलेले तरूण निघून गेले.पोलिसांनी मंजूला पोलिस ठाण्‍यात आणून तिच्याकडून म‍ाहिती घेण्‍यास सुरूवात केल्यानंतर
जे ऐकण्‍यास मिळाले ते चक्रवून टाकणारे होते.