आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Racket, Busted, Wife, Foreign, Crime, College, Girl, Nagpur, Maharashtra

पत्नीनेच फाडला बुरखा, पतीने सुरू केला होता कुटुंबातील महिलांच्या ब्ल्यू फिल्मचा \'उद्योग\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पैशांच्या हव्यासापोटी माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. येथील सायबर क्राईम ब्रँचने एक लॅपटॉप उघडला आणि गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवणारे पोलिसच कोड्यात पडले आहेत. स्वतःच्याच कुटुंबातील महिलांची ब्ल्यू फिल्म बनवून पैसे कमावण्याचा धंदा एका सभ्य वस्तीत सुरू होता.

राज्याच्या उपराजधानीत ब्ल्यू फिल्मचा बिझनेस परदेशापर्यंत पोहचला असल्याचे उघड झाले आहे. आरोपीच्या लॅपटॉपमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. प्राथमिक माहितीनुसार आरोपी नागपूरमध्ये ब्ल्यू फिल्मची शुटिंग करून त्याची सीडी लाखो रुपयांत परदेशात विकत आहे. अजून या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असला तरी चकरावून टाकणारी बाबम्हणजे, स्वतःच्याच कुटुंबातील महिलांच्या फिल्म्स बनवल्या जात होत्या. त्याशिवाय महाविद्यालयीन युवतींनाही त्याने जाळ्यात ओढले होते.

आरोपी धर्मेंद्र बंसीलाल जैन (48) याच्या पत्नीच्या तक्रारीवरून हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रसाद नगर या शांत आणि सभ्य वस्तीत बंगला क्रमांक 44 मध्ये हा 'उद्योग' सुरू होता. हिंगणा नाका येथे त्याचे गीता इंजिनिअरिंग दुकान आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी छापा टाकून आरोपी धर्मेंद्रसह लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. सायबर क्राईम ब्रँचच्या मदतीने पोलिस तापास करत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, कसा झाला रॅकेटचा खुलासा आणि चीनपर्यंत आरोपीचे हात