आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Racket Open At Chandrapur, 25 Girls Arrested By Police

चंद्रपूरमध्ये सेक्स रॅकेट; दोन महिला एजेंटसह 25 तरुणींना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर- शहरातील उच्चभ्रू वस्तीत चालणार्‍या दोन कुंटणखान्याचा पोलिसांनी भांडाफोड केला. या कारवाईत दोन महिला एजेंटसह 25 तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. औद्योगिकरणामुळे चंद्रपूर शहरातचा विकास होत आहे तर दुसर्‍या बाजुला वेश्या व्यवसाय फोफावत चालला आहे. नवे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरु केली आहे.
शहरातील गौतमनगर आणि गंजबाजार या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून महिला दलाल आणि त्यांच्या सांगण्यावरून देहविक्री करणार्‍या एकूण 25 तरुणींना ताब्यात घेतले आहे. नागपूर, गोंदिया आणि आंध्रप्रदेशातून तरुणींना चंद्रपुरात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन मॉडेलसह एजंटला अटक