आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडार्‍यात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण; मुख्याध्यापकावर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एका आश्रमशाळेत शिकणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद भुसारी (47) असे नराधम आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भुसारी आणि त्याचा सहकारी विवेक चवळे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षभरापासून भुसारीने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले होते. याबाबत कोणालाही माहिती दिल्यास तुमची बदनामी करू, अशी धमकीही दिली होती. यानंतर यातील एका पीडित मुलीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. घटनेनंतर भुसारी आणि त्याचा सहकारी फरार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.