आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहातील अल्पवयीन विद्याथिर्नीवर अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या वसतिगृहात राहणा-या अल्पवयीन मुलीवर गेल्या अडीच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले जात होते. यातून तिला गर्भधारणा झाल्याने हे प्रकरण रविवारी उघडकीस आले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन युवकांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा, अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपी राहुल दत्तात्रय काळे (२२) आणि त्याच्या दोन साथीदारांनी पीडित मुलीला वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकी दिली होती.

ऑगस्ट २०१२ पासून आरोपीने अशाच धमकी देत पीडित मुलीवर आपल्या मित्रांच्या सहकार्याने वारंवार अत्याचार केला. या अत्याचारात तिला सात महिन्यांची गर्भधारणा झाली. हे प्रकरण रविवारी उघडकीस आल्यानंतर वसतिगृह अधीक्षिकेसोबत पीडित मुलीने कळंब पोलिस ठाणे गाठले. या वेळी मुलीने आपबीती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपी राहुल दत्तात्रय काळे (२२) व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२), १०९, ११४, ५०६, यांच्यासह बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायदा, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवला. दरम्यान, आराेपींना अजून अटक करण्यात आलेली नाही.