आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहिदाकडे पाठ फिरवून उद्घाटनाला जाणारे पृथ्‍वीराज चव्हाणांचे कृत्य निंदनीय- तावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शहीद कुंडलिक माने यांच्या घरी न जाता एका सराफा दुकानाचे उद्घाटन करण्यास जाणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हे कृत्य निंदनीय आहे. त्यांनी महाराष्‍ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.


चिमूर (जि. चंद्रपूर) येथे आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. तावडे म्हणाले, शहीदांपेक्षा मुख्यमंत्र्यांना सराफा दुकानाचे उद्घाटन महत्वाचे वाटले, हे निंदनीय आहे. वेगळा विदर्भ ही भाजपाची भूमिका आहे. चंद्रपूर येथे पालकमंत्र्यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेकीची घटना निंदनीय आहे. पण मंत्र्यांनीही आपले पद आणि अधिकाराचा वापर जनतेसाठी केला पाहिजे, असा टोलाही तावडे यांनी लगावला. पूरग्रस्तांवर झालेला लाठीहल्ला टाळता आला असता. विदर्भातील पूर परिस्थिती गंभीर आहे. पण सरकारने पूरग्रस्तांना केलेली मदत अपुरी आहे. 7 हजार रुपये एकरी मदत तुटपुंजी असून सरकारने किमान एकरी 25 हजार रूपये मदत करायला हवी. पावसात पडलेल्या घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. मात्र, पाऊस थांबल्यानंतर जीर्ण झालेल्या घरांचे सर्व्हेक्षण झालेले नाही. सर्व्हेक्षणाचा कालावधी किमान पाच दिवसांचा असावा, असेही तावडे म्हणाले.