आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Deputy Chief Minister, Divya Marathi, NCP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भाने शरद पवारांना पुरेशी साथ दिली नाही, अजित पवार यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी सत्ता स्थापन केली. मात्र, शरद पवारांसारखा ताकदीचा नेता असतानाही महाराष्‍ट्रात ते शक्य झाले नाही. विदर्भाने पवारांना हवी तशी साथ दिली नाही,’ अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, आम्ही केवळ पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला नाही. विदर्भालाही सातत्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या निवडणुकीत विदर्भाने राष्‍ट्रवादीला चारच आमदार दिले. त्यांनाही आम्ही पदे देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठ्यांचा पक्ष म्हणून आमच्यावर टीका होते. मात्र, मराठेतर समाजांनाही आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे पवार म्हणाले.

मोदींनी वाघाचे मांजर केले
लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे राज्यात शिवसेनेला जीवदान मिळाले. त्यांना राज्यात 18 जागा जिंकता आल्या. मात्र, दिल्लीत त्यांना कुठलीही किंमत नाही. केवळ एक मंत्रिपद देऊन त्यांची बोळवण केली. मोदींनी शिवसेनेच्या वाघाचे पार मांजर करून टाकले आहे, अशी बोचरी टीकाही पवार यांनी केली. लोकसभेचे निकाल विसरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.