आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार, गडकरी आज एका व्यासपीठावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी शनिवारी 12 रोजी पूर्तीतर्फे आयोजित कार्यक्रमात एका व्यासपीठावर येत आहेत. घरगुती गॅसला पर्याय म्हणून पूर्तीने तयार केलेला पॅलेट स्टोव्ह, कृषी कचर्‍यापासून पॅलेट निर्मिती या दोन्ही प्रकल्पांचा शुभारंभ आणि पहिल्या टप्प्यातील इ-10 पेट्रोलपंपधारकांना करारपत्र वितरणाचा कार्यक्रम पूर्तीतर्फे हॉटेल सन अँड सँडमध्ये सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. या वेळी उभय नेते शेतकर्‍यांशी संवाद साधतील.