आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shirdi Temple Fund Distribut To People Says Swami Swaroopanand Saraswati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'शिर्डीच्या मंदिराचे राष्ट्रीयीकरण करा, संपत्ती गरजूंत वाटून टाका'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘सनातन हिंदू धर्माचे साईकरण बंद करावे, असे सांगतानाच शिर्डीच्या साई मंदिराचे राष्ट्रीयीकरण करून मंदिराची संपत्ती गरजूंना वाटून द्यावी. नाहीतर ही संपत्ती एक दिवस वक्फ बोर्डाची मालमत्ता होईल,’ असा स्पष्ट इशारा द्वारका-शारदा पीठाधीश्वर स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी दिला.

नागपुरात ते पत्रकारांशी ते बोलत होते. साई शताब्दी महोत्सवासाठी १,२०० कोटी आणि ३०० एकर जमीन देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी महोत्सवासाठी अजिबात जमीन व पैसे देऊ नये, असे सांगून शंकराचार्य म्हणाले, ‘सध्या हिंदूंनी चार ते पाच मुले होऊ द्यावी, असे सल्ले देण्यात येत आहेत. त्यापेक्षा देशात समान नागरी कायदा लागू करावा. म्हणजे वाढत्या मुस्लिम लोकसंख्येला आळा बसेल.’

साईबाबा ना अवतार होते, गुरू होते, ना संत होते, तरीही त्यांचे पद्धतशीर स्तोम माजवण्यात येत आहे. मात्र, विहिंप तसेच अशोक सिंघल याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाही. बारा वर्षांनंतर हिंदूंचे राज्य आले, असे सिंघल म्हणाले. पण, हे कसले हिंदू राज्य, असा सवाल करून स्वत:ला हिंदू म्हणवणारेही साई दरबारात लीन होतात, अशी टीका शंकराचार्यांनी केली.
पुढे वाचा, साई पुराण लिहिणार्‍या भक्तांनी साई कुराण लिहून दाखवावे...