आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Moghe News In Marathi, Vidarbh, Modi, Narendra Modi

विदर्भात मोदींची लाट नाही - शिवाजीराव मोघे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - विदर्भात नरेंद्र मोदी यांची लाट नाही. ते खोटे बोलण्यात पटाईत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा काँग्रेस, राष्‍ट्रवादी तसेच रिपाइंच्या सहकार्याने मोठ्या फरकाने निवडून येइन, असे प्रतिपादन शनिवारी शिवाजीराव मोघे यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी माणिकराव ठाकरे यांना देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यांनी फक्त यवतमाळची जबाबदारी न घेता संपूर्ण महाराष्‍ट्राची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यांनीच आपले नाव सुचवल्याने पक्षाने उमेदवारी दिल्याचे मोघे यांनी सांगितले. काँग्रेस तसेच राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनाव नाही. अजित पवारांनीसुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील राष्‍ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी आपल्यासोबत असल्याने विजय निश्चित आहे. अन्न सुरक्षा, कर्जमाफी यासह अनेक महत्त्वाचे निर्णय काँग्रेसची देण असल्याने नागरिकांचा काँग्रेसवर विश्वास असल्याचेही मोघे म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी काँग्रेस तसेच राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


तन आणि मन : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मनोहर नाईक यांनी आपण तन आणि मनाने काम करणार असल्याचे सांगितले. धनाने करणार की नाही हे सांगता येत नाही, असे म्हणताच मेळाव्यात चांगलाच हशा पिकला.


एकला चलो रे : पत्रकार परिषदेत शिवाजीराव मोघे एकटेच आले. त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. तेव्हा बाहेर पेंडॉलमधील कार्यक्रमात माणिकराव ठाकरे, मनोहर नाईक यांची उपस्थिती होती.