आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Suman Kalyanpurkar Distress To Sold Music

अडथळे असह्य झाल्याने पार्श्वगायन सोडले, सुमन कल्याणपूर यांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘खरे सांगायचे तर मी पार्श्वगायनात खूप रमले होते. रमता रमताच माझ्यापुढे अडथळे येत गेले. अडथळे प्रत्येकच क्षेत्रात येतात, पण ते इतके असह्य झाले की मला पार्श्वगायन सोडावे लागले,’ अशी खंत प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी रविवारी व्यक्त केली.

मैत्री परिवाराच्या वतीने सुमन कल्याणपूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर त्यांची प्रकट मुलाखत घेतली. ‘तुम्ही अचानक पार्श्वगायन का सोडले,‘ या प्रश्नावर सुमनताई अत्यंत हळव्या झाल्या होत्या. “पार्श्वगायनात रमल्यावर आलेले अडथळे पेलवेनासे झाल्याने नाइलाज झाला व ते सोडावे लागले,’ अशी खंत व्यक्त करतानाच या विषयावर अधिक स्पष्टीकरण देण्याचे आणि जुना वाद पुन्हा उकरून काढण्याचे सुमनताईंनी टाळले. मात्र, या वेळी उपस्थित जाणत्या श्रोत्यांच्या मनावर जुन्या वादाचे तरंग कायम उमटत राहिले.
पेपरमध्ये लिहिले गाणे
वयाच्या पाचव्या, सहाव्या वर्षी कोलकाता सोडून मुंबईत आल्यावर अाधी मराठीने त्यानंतर मराठी गाण्यांनी वेड लावले, इतके की परीक्षेत संस्कृतचा पेपर देत असताना सारे लक्ष बाहेर वाजणाऱ्या गाण्याकडेच होते.
संस्कृतच्या त्या पेपरमध्ये चक्क ते गाणेच लिहिले, अशी आठवण सुमनताईंनी सांगितली.
पाण्याच्या टाकीवर रियाज
लहानपणी घरात बसून मोठ्याने गायची अडचण व्हायची. अशा वेळी घरावरील पाण्याच्या टाकीवर बसूनही मैत्रिणीसह गाण्याचा रियाज व्हायचा, अशीही आठवण सुमनताईंनी सांगितली. प्रकट मुलाखतीदरम्यान रसिक श्रोत्यांच्या आग्रहास्तव ७६ व्या वर्षी सुमनताईंनी त्याच उत्साहात ‘जिथे सागरा धरणी मिळते..’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे..’, ‘ना ना करते प्यार..’ आपल्या निवडक गाण्यांची झलक सादर केली.