आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Singing Of A Broken Record: 815 Hours Of Continuous Music New World Record!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाण्याचा नवा विक्रम : ८१५ तास गाऊन स्थापन केला नवा विश्वविक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील १५ गायकांनी १५ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक ८१५ तास गीत गायनाचा विश्वविक्रम नोंदविला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०६ फुट उंच पुतळ्यासाठी निधी उभारण्याकरिता हा विश्वविक्रम करण्यात आला आहे.

कामठी रोड येथील जसवंत तुली मॉल येथे गेल्या ३५ दिवसांपासून युथ वेलफेअर असोसिएशनचे प्रमुख मनीष पाटील, गायक सुरज शर्मा आणि गायकांनी हा विक्रम नोंदवला आहे. शुक्रवारी त्यांनी शहीद या चित्रपटातील 'कर चले हम फिदा जानो तन साथीयों' हे शेवटचे गीत गाऊन सलग ८१५ तास गाण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

३५ दिवस सलग गाण्याचा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठविण्यात आला आहे. १२ जानेवारीपासून १५ गायक हा विक्रम करण्यासाठी झटत होते. शुक्रवारी ४.४० वाजता त्यांचे प्रयत्न फळाला आले. त्यांनी सलग ८१५ तास गाण्याचा नवा विक्रम केला होता. याआधी ७८१ तास ३० मिनीट हा सर्वाधिक तास गाण्याचा विक्रम होता. तो माडीत काढून नागपूरच्या तरुण गायकांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तरुणांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचत आनंद साजरा केला.

रामटेक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ६०६ फुटी भव्य पुतळा उभारण्याच्या उद्देशाने हा विश्वविक्रम करण्याचा मनोदय तरुण गायकांनी केला होता. १२ जानेवारी रोजी भीम की बेटी या गाण्याने या सुरुवात करण्यात आली होती.

यांनी रचला विक्रम

गायक सुरज शर्मा, प्रफुल्ल सांगोडे, सुलभा खोब्रागडे, रामबाबू आचार्य, प्रेम डेकाटे, मंगेश वानखेडे, रक्षंदा बांबोले, प्राजक्ता मानकर, हिमांशु दुर्योधन, विजय रामटेके, सियाराम, राजन, श्रीपुत्र वानखेडे, मनोज बहादुरे आणि हरीश राऊत यांनी या विश्वविक्रमासाठी गाणे गायीले आहेत.