आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Labourer Death In Nagpur Due To Gas Lekage In Well

नागपूर जिल्हय़ात विहिरीत वायुगळती झाल्याने सहा मजुरांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जिल्हय़ातील कचारी सावंगा (ता. कटोल) गावात विषारी वायूची गळती झाल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ग्रामपंचायत सदस्य रवी जयस्वाल यांच्या विहिरीतून गाळ उपसण्याचे काम सुरु होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास विहिरीत वायूगळती झाल्याने दोन मजूर बेशुद्ध झाले. त्यांना वाचविण्यासाठी आणखी पाच जण विहिरीत उतरले, यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांची प्राणज्योत रूग्णालयात उपचारा सुरू असताना मालवली. जीवन मारबते (32), चिरकू बावने (45), हरीश्चंद्र बावने ( 43), भूषण मानमोडे (27), आदेश सोनवणे (26) आणि सुनील आहाके (20) अशी मृतांची नावे आहेत.