आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली: पोलिसांच्‍या गोळीबारात सहा नक्षलवादी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - गडचिरोली जिल्‍ह्यातील एटापल्ली भागात आज (रविवार) सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांत झालेल्या गोळीबारात सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड सीमेवर झाली. गोळीबारात मारले गेलेल्‍या नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहेत.

गडचिरोली पोलिस दलाचे प्रवक्ते धर्मेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या एटापल्ली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीम राबविताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्‍ला केला. गडचिरोली पोलिसांची सी-50 बटालियनने दिलेल्‍या प्रत्युत्तरात सहा नक्षलवादी ठार झाले.

घटनास्थळाहून एक कार्बाईन, एक .३०३ बंदुक, तीन गावठी बंदुका, हॅंडग्रेनेड आणि काही नक्षलविषयी पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.