आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीमध्‍ये पोलिसांसोबत चकमकीत 6 नक्षलवादी ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाल्‍याची माहिती आहे. गोविंदगाव येथे रविवारी पहाटे ही चकमक उडाली.

प्राप्‍त माहितीनुसार, नागपूरपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर जिमालगट्टा जंगलात गोविंदगाव गावात ही चकमक उडाली. काही नक्षलवादी दडून बसल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर ही कारवाई करण्‍यात आली. त्यात पोलिसांनी 6 नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये 2 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. सर्व मृतदेह अहेरी येथील पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहेत.

पोलिसांना घटना स्थळी मोठा शस्‍त्रसाठा सापडला आहे. त्‍यात 2 एसएलआर रायफल, दोन .303 रायफल आणि 12 बोअरच्या 2 बंदुका मिळाल्या आहेत. मृतांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. त्यात जेव्हीसी सदस्य शंकर, दलम कमांडर विनोद, त्याची पत्नी गीता आणि अन्य दोघांचा समावेश आहे.