आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबरअखेर सोनिया गांधींचा नागपूर दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर दौर्‍यावर येणार असल्याचे संकेत आहेत. राज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही विस्तार होणार असून, त्याचा शुभारंभ नागपुरातून सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी यांच्या नागपूर दौर्‍याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, हा दौरा ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत.