आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरीच्या वारीसाठी चार विशेष रेल्वेगाड्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आषाढी एकादशीच्या औचित्यावर पंढरपूरवारीसाठी अमरावतीवरून चार विशेष गाड्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंजुरीनंतर पंढरपूरसाठी किती गाड्या सोडाव्यात, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंढरपूरसाठी या गाड्या सोडण्यात येतील. मागील वर्षी अशा तीन गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदाची गर्दी बघून जादा गाड्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आषाढी एकादशीसाठी शहरातून मोठ्या प्रमाणात भक्तांचा मेळा जात असतो. दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातून पंढरी वारीसाठी रेल्वेने विशेष गाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अमरावतीतून सुटणारी रेल्वे आठ डब्यांची : पंढरपूरवारीसाठी अमरावती रेल्वेस्थानकाहून आठ डब्यांची विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. उर्वरित आठ डबे खामगाववरून जोडण्यात येतील. सुमारे पंधराशे प्रवासी विशेष गाडीने पंढरपूरला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
अमरावतीवरून रेल्वे प्रशासनाकडे विशेष रेल्वेगाड्यांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा वारकर्‍यांना लागली आहे.
खिशाला चाट
मध्य रेल्वेने आठ महिन्यां नंतर तिकीटदरात 14.2 टक्क्यांनी दरवाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे. ऐन आषाढी एकादशीच्या कालावधीत विठ्ठलाचे दर्शन महागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पूर्वी पंढरपूरसाठी अमरावती रेल्वेस्थानकावरून 175 रुपये मोजावे लागत होते, आता जास्त रुपये मोजावे लागतील.
(संग्रहित छायाचित्र)