आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात एसटी बसला अपघात, जिवत हानी मात्र शून्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्य परिवहन महामंडळाची बस पुलावरून कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील व्याळानजीक घडली. या घटनेत नऊ महिलांसह 35 प्रवासी सुदैवाने बचावले, ते जखमी झाले आहेत.


रिसोड आगाराची बस (एमएच-07-सी-9485) मंगळवारी दुपारी शेगावहून रिसोडकडे निघाली होती. ख्वाजा बुलंद शहा वली दर्ग्यानजीकच्या नाल्यावरील पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विभागीय वाहतूक नियंत्रक प्रशांत भुसारीही कर्मचा- यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ, तहसीलदार राजेश हांडे, यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींना एसटी महामंडळाकडून आर्थिक मदत देण्यात येईल, असे एसटीचे विभागीय नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी सांगितले.


पुलाला कठडे नाहीत
हजरत ख्वाजा बुलंद शहा वली दर्ग्याजवळ असलेल्या या पुलाला कठडे नाहीत. केवळ दोन फूट उंच सिमेंट ओट्यांचे बांधकाम केले आहे. यापूर्वीही या पुलावरून वाहन कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.