आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Medical Staff Waiting For Promotion, Latest News

राज्‍यातील वैद्यकीय कर्मचारी पदोन्नतीच्‍या प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यातील 1500 वैद्यकीय कर्मचारी मागील 24 वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित आहेत. नियमानुसार कर्मचार्‍यांच्या वेतनात दरवर्षी वाढ करणे अनिवार्य असूनही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांची बढती थांबली आहे. राज्यातील विमा रुग्णालयांची दयनीय अवस्था असल्यामुळे कर्मचार्‍यांचे अतोनात हाल होत असून परिचारिका नसल्यामुळे रुग्णांनाही कष्ट सहन करावे लागत आहेत. राज्य सरकार मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. पदोन्नतीची प्रक्रिया सुरू असून लवकरच कर्मचार्‍यांचे वेतन वाढवले जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महिन्यांपासून विमा रुग्णालय रिकामे
उपराजधानी नागपूरचे शासकीय विमा रुग्णालय परिचारिकांच्या अभावामुळे ओस पडले आहे. येथील 10 वॉर्डपैकी फक्त तीनच वॉर्ड सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.
नियमांत फेरबदल
पॅरामेडिकल कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्या करण्यासाठी नियमांत फेरबदल करण्यात आले आहेत. यासाठी विभागाची बैठकही झाली असून विमा रुग्णालयांमध्ये लवकरच परिचारिकांची भरती केली जाणार आहे.
डॉ. संजय गायकवाड, संचालक, राज्य कामगार विमा योजना,मुंबई