नागपूर- राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांना नागपुरातील रवी भवन येथे धमकीचा शुक्रवारी सायंकाळी फोन आला होता. नंतर एकनाथ शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे शुक्रवारी नागपुरातल्या रवी भवनामध्ये उपस्थित होते. त्यावेळी शिंदेंना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास 12 अंकी क्रमांकावरुन फोन आला. शिंदे यांनी फोन उचलला असता समोरच्या व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिंदेंनी नागपूरचे पोलिस आयुक्त के.के.पाठक यांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिस तपास करत असून एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.