आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Run Only By BJP's Four Ministers, Sena State Minister Attacked

राज्याचा कारभार भाजपच्या चार मंत्र्यांच्या मनावर चालला, सेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांचा संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - ‘राज्याचा कारभार भाजपच्या फक्त चार मंत्र्यांच्या मनावर चालला आहे. मला गोरगरीब जनतेची कामे करायची आहे. मंत्रिपद मिळूनही मी त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर मला हा लाल दिवा नको,’ या भूमिकेचा पुनरुच्चार शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.

आपल्याला काम दिले जात नसल्याचे सांगत राठोड यांनी मंगळवारी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या नाराजीचे नेमके कारण विचारले असता राठोड म्हणाले, ‘मदत व पुनर्वसनबाबत काही फाइल्स मागितल्या तर तुमचे ते खाते नाही, अशा प्रकारची उत्तरे दिली जात आहेत. आम्हाला कुठलेच निर्णय माहीत होणार नसतील तर आम्ही नागरिक तसेच शेतक-यांना काय उत्तरे द्यायची?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मला मंत्रिपद मिळाले असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा विश्वास ठेवूनच हे पद दिले आहे. त्यामुळे बिनकामाचा नुसता मिरवणारा मंत्री मला बनून राहायचे नाही. उद्धव ठाकरे यांनी दोन महिन्यांच्या कामाचा आढावा घेण्याबाबत बोलावलेल्या
बैठकीत आपण त्यांच्यासमोर या व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना भेटणार
दिवसरात्र काम करून आम्ही जनतेची सेवा करीत आहे. असे असताना भाजपच्या नेत्यांकडून मिळत असलेली सापत्न वागणूक संताप आणणारी आहे. त्यामुळे दोन दिवसात स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना या सर्व घटनेची माहिती देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

मला राग येतोय...
मदत व पुनर्वसनच्या फाइल्स मी बघण्यासाठी मागितल्या होत्या. मात्र मला त्या देण्यात आल्या नाही. त्यामुळे मला राग आला, असे राठोड यांनी सांगितले. हा राग त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केला. आता मुख्यमंत्र्यांसमोरसुद्धा व्यक्त करणार आहे.
संजय राठोड, महसूल राज्यमंत्री