आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंद कुलकर्णी, ठाेंबरे वैधानिक विकास मंडळावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तिन्ही विकास मंडळांवरील तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्त्या राज्यपालांच्या कार्यालयाने जाहीर केल्या आहेत.

मराठवाडा विकास मंडळावरील पाचपैकी केवळ चार नियुक्त्या जाहीर केल्या असून, त्यात किनवटच्या (जि. नांदेड) साने गुरुजी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे डॉ. अशोक बेलखोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅच्युरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीजचे बी.बी. ठोंबरे, औरंगाबादचे मुकुंद कुलकर्णी आणि शंकर नागरे यांचा समावेश आहे. उर्वरित महाराष्ट्र मंडळावरील तीनच नियुक्त्या जाहीर झाल्या असून, त्यात पालघर जिल्ह्यातील ब्रायन लोबो, पुण्याचे आर. के. मुटाटकर आणि माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांचा समावेश आहे.

विदर्भ विकास मंडळावर माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर, मेळघाटात आदिवासींसाठी आयुष्य वाहुन घेणारे डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे सुपुत्र डॉ. आनंद, यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या माध्यमातून कार्य करणारे डॉ. किशोर मोघे आणि नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते कपिल चांद्रायण यांचा समावेश आहे.

अध्यक्षांची निवड केव्हा : विकास मंडळावरील तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्त्यानंतर आता तिन्ही मंडळावरील अध्यक्षांच्या राजकीय नियुक्त्यांचा किचकट प्रश्न सोडवावा लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...