आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभिनाडी जतन करण्यात कंपन्यांची गळेकापू स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘नाभिनाडी (स्टेमसेल) जतन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा असून, याबाबतीत कंपन्यांचे प्रतिनिधी कमालीची गुप्तता बाळगत आहे. नाभिनाडी, स्टेमसेल वा बाळाची नाळ साठवून त्याचा उपयोग अनेक दुर्धर आजारांवर करण्यात येतो. नाभिनाडीचे जतन करणाऱ्या कंपन्यांमध्ये भारतात लाइफ सेल, क्रायो स्टेमसेल, कॅर्डलाइफ, बेबी सेल, रेलीकाॅड आदी अनेक कंपन्या आहे. या स्टेमसेल (मूळ पेशी) रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, सिकलसेल, मधुमेह, हृदयाचा आजार, सेरेब्रल पाल्सी, पाठीच्या मणक्याची दुखापत, वंध्यत्व, अंधत्व व दृष्टी िवकास आदी सुमारे ७० आजारांवर उपयोगी आहे,’ अशी माहिती नागपुरातील स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डाॅ. नीता सिंग यांनी दिली.

स्टेमसेल वा नाळ ही लिक्वीड नायट्रोजनमध्ये जतन करून ठेवली जाते. त्यामुळे त्याला जतन करण्याची मर्यादा नाही. एवढेच नव्हे तर मेंदूच्या आजारातही स्टेमसेल अत्यंत उपयुक्त असल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आदी ठिकाणी या कंपन्यांच्या स्टेमसेल बँक असून, िवदर्भ व महाराष्ट्रात कंपन्यांचे प्रतिनिधी नाळ संकलनाचे काम करतात. त्वचा, हाडे, अवयव तसेच पेशी िरकव्हरीमध्ये स्टेमसेल खूपच उपयुक्त आहे. डाॅ. नीता िसंग याही स्टेमसेल संकलनाचे काम करतात. वर्षभरात सुमारे ५० स्टेमसेल संकलन माझ्याकडे होते. पूर्वी स्टेमसेल संकलन खूपच महागडे होते. त्यासाठी ६० ते ७० हजार रुपये लागायचे. आता २० ते ४० हजारात जतन होते. स्पर्धा आणि सामान्यांना परवडावे म्हणून काही कंपन्यांनी शुल्क कमी केले आहे, असे त्या म्हणाल्या. लाइफसेल ही सर्वात पहिली स्टेमसेल जतन करणारी कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

स्टेमसेलचा प्रवास
स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशनचा पहिला प्रयत्न १९५७ मध्ये झाला. १९६१ मध्ये यािवषयी पहिला लेख प्रकाशित झाला. १९६८ मध्ये पहिले यशस्वी बोनमॅरो स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन झाले. तर १९७३ मध्ये एकमेकांशी संबंध नसलेल्या माणसांमध्ये स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन करण्यात आले. २००५ मध्ये युनायटेड स्टेट्स काँग्रेसने स्टेमसेल उपचार आणि संशोधन कायदा तर २००९ मध्ये नाभिरक्त जागृती आणि शिक्षण कायदा पारित केला.

२०१२ मध्ये रक्ताच्या कर्करोगासाठी स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन केले. आतापर्यंत नाळ संकलनाचे प्रमाण हजार बाळामागे तीन होते. आता ते हजारामागे पाचपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहे. िलसा रे या अभिनेत्रीला मल्टिपल मायलोमा हा दुर्मिळ आणि दुर्धर रक्ताचा कर्करोग झाला. पण,
स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशनमुळे लिसा रे पूर्णत: बरी झाली. ितला कर्करोगमुक्त घोिषत केले.