आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीला वादळाचा तडाखा; एक जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे अनेक भागांतील घरे व झाडे कोसळली. वादळामुळे पत्र्यावरून कोसळल्याने संजय सोमाजी भालेराव (वय ५०) यांचा मृत्यू झाला, तर शहरातील विविध घटनांमध्ये १२ जण जखमी झाले.

सुमारे तीन मिनिटे वादळाची तीव्रता सर्वाधिक होती. महावीर कॉलनीमध्ये एका घरावर संजय सोमाजी भालेराव हे पत्रे टाकत होते. वादळात पत्रे उडून भालेराव कोसळले. डोक्याला मार लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शहरात एका जिमनॅस्टिक हॉलचे बांधकाम सुरू आहे. या हॉलची दत्तूवाडी परिसराला लागून अंदाजे ५० फूट उंच व १५० फूट रुंदीची भिंत तयार झाली होती. ही भिंत कोसळून यामध्ये पाच घरांची हानी झाली; तसेच एक घर पूर्णत: दबले. यात कल्पना महात्मे, त्यांचा मुलगा विशाल जखमी झाले.

हवेचा वेग : ४८ कि.मी./ तास, एकूण कालावधी : ३८ मिनिटे, वार्‍याची दिशा : उत्तरेकडून हवेचा दाब : १००७ मिलीबार, सापेक्ष आर्द्रता : २६ टक्के, वादळाचा अंदाजे कालावधी : ३ ते ४ मिनिटे.