आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर: मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नागपूरच्या सेशन कोर्टाने हा निकाल दिला. मोनिकाच्या आई-वडिलांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 11 मार्च 2011 रोजी नागपूरच्या नंदनवन परिसरात 21 वर्षांची मोनिकाची हत्या झाली होती.
कुणाल अनिल जैस्वाल, प्रदीप महादेव सहारे, श्रीकांत सोनकर, उमेश मराठे अशी दोषींची नावे आहेत तर, रामेश्वर सोनेकर आणि गीता मालधुरे या दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
मूळची रामटेकची असलेली मोनिका नागपुरातील नंदनवन परिसरातील प्रतिभा पवार महिला वसतिगृहात राहत होती. तर, राजश्रीताई मुळक अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती. 11 मार्च 2011 रोजी मोनिका सकाळी वसतिगृहातून महाविद्यालयाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या चार हल्लेखोरांनी वार करुन तिची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. पोलिस तपासात कुणाल जैस्वाल हा प्रमुख आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, कुणालला दुस-याच एका मुलीची हत्या करायची होती मात्र त्याने ज्या भाडोत्री गुंडांना संबंधित मुलीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. त्यातील आरोपींना मोनिका ही तीच मुलगी असल्याचे वाटल्याने त्यांनी मोनिकावर हल्ला केला व त्यात तिचा मृत्यू झाला होता.
कुणाल जैस्वालाचे मोनिका राहत असलेल्या वसतीगृहातील वृषाली नावाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र, वृषालीने कुणालचे प्रेम नाकारले होते. कुणालला हे अपमानास्पद वाटत होते त्यातूनच त्याने वृषालीची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर कुणालने चार भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन वृषालीच्या हत्येची सुपारी दिली होती. मात्र, भाडोत्री गुंडांनी वृषालीवर हल्ला करण्याऐवजी चुकून निष्पाप मोनिकावर हल्ला केला होता.