आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक उत्पन्न घेणा-या शेतक-यास आदर्श माना, नितीन गडकरींचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गाव, घर, शिवार आणि शेतातील कच-यापासून निर्माण होऊ शकणा-या खतांसाठी गावपातळीवर पुढाकार घ्या. प्रत्येक शेतक-याने आपल्या गावात सर्वाधिक उत्पादन घेणा-या शेतक-यास आदर्श मानून त्याच्या अनुकरणाचे प्रयत्न करत गावाची समृद्धी साधावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
अॅग्रोव्हिजन सेंद्रिय शेतीशाळेच्या उद््घाटन सत्रात गडकरी बोलत होते. शेती आणि पूरक उद्योग याचा समन्वय साधून शेतक-यांना संकटावर मात करता येईल. सेंद्रिय खते कमी खर्चामध्ये कशी तयार होतील याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून माणसाप्रमाणेच जमिनीचे आरोग्य जाणून घेण्यासाठी प्रत्येक शेतक-याकडे जमिनीचे आरोग्य सांगणारी ‘मृदा आरोग्य पत्रिका (साॅइल हेल्थ कार्ड) असले पाहिजे. येत्या पाच वर्षात सर्व विहिरींना चोवीस तास पाणी राहील या दृष्टीने योजना आखल्या गेल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

त्यात पाणीटंचाईग्रस्त गावांना प्राधान्य असावे, अशी सूचना त्यांनी केली. सेंद्रीय खत तयार करण्यासाठी ५ लाख रुपये किमतीचे यंत्र नागपूर जिल्हयातील बचतगटांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विदर्भ व मराठवाड्यातील कृषी पंपाचा अनुशेष दूर करणे, साडेसात हजार सोलर पंप पुरवण्याचा पथदर्शी प्रकल्प, जलयुक्त शिवार यासारख्या कृषीसाठी आवश्यक योजनांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख त्यांनी या वेळी केला. घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे, सेंद्रीय शेती करणारे अभिनेते मनोज जोशी, माजी खासदार श्री. दत्ता मेघे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.