आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या करणारी महिला सज्जात अडकल्याने वाचली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कुटुंबीयांशी भांडण झाल्यामुळे दुसर्‍या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी महिला इमारतीच्या बाह्य भागाला काढण्यात आलेल्या सज्जाला अकडली. काही वेळातच घटनास्थळी आलेल्या पोलिस व अग्निशमन जवानांच्या मदतीने तिचे प्राण वाचवण्यात आले.
कळबी चौक परिसरातील एका चार मजली निवासी संकुलात निरंजना राजेंद्र गाविची (48) या राहतात. बुधवारी सकाळी त्यांचे कुटुंबीयांशी भांडण झाले. त्यामुळे त्यांनी बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तळमजल्याच्या छताला बाह्य भागाला अतिरिक्त सज्जा काढण्यात आला आहे. त्यामुळे सज्जावर त्या अडकल्या.
इमारतीच्या समोर चहाची टपरी आहे. ही महिला सज्जावर अडकल्याचे बघून चहा टपरीवरील लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी पोलिसांना दूरध्वनी करून माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन जवानांच्या मदतीने महिलेला सुखरुप खाली उतरवले. तिच्या पायाला इजा झाली असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.