आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाचा एकही रुपया पळवला नाही : तटकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - एक लाख कोटींचा निधी संपूर्ण विभागालाच मिळालेला नसताना तो कसा वळवता येईल, असा प्रo्न उपस्थित करत विदर्भाचा एकही रुपया पळवला नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिले. विदर्भातील निर्माणाधीन आणि भविष्यकालीन प्रकल्पांचा आढावा बैठक येथील सिंचन भवनात आयोजित बैठकीत घेण्यात आला त्यानंतर तटकरे पत्रकारांशी बोलत होते.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या मूळ धरणाचे बांधकाम तीन वर्षापूर्वीच झाले असले तरी त्यात केवळ 236 दलघमी इतकाच पाणीसाठा करू शकलो. मात्र, आता 242 दलघमी पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यात आले असून हे लक्ष्य साध्य झाल्यास विदर्भात 1 लाख 72 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. त्यामुळे एनटीपीसीचा 1 हजार मेगाव्ॉट वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

खासगी व्यक्तीही देऊ शकतो पुरावे: सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाकडे अशासकीय किंवा खासगी व्यक्तीसुद्धा प्रकल्पातील आर्थिक अनियमततेसंबंधीचे पुरावे सादर करू शकेल अशी माहिती तटकरे यांनी या वेळी दिली. एसआयटीचे अध्यक्ष डॉ.माधव चितळे यांनी चौकशी समितीला खासगी व्यक्तींना सादर केलेली कागदपत्रे किंवा पुरावे स्वीकारण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले होते. गोसेखुर्द प्रकल्पातील निकृष्ट दर्जाची कामे आणि आर्थिक अनियमिततेशी संबंधित व्हीआयडीसीतील 45 अभियंत्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच विदर्भातील 45 प्रकल्पांना सुधारित मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. 75 ते 80 टक्क्यांपर्यत पूर्ण झालेले प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण केले जातील. यानंतर जमीन ताब्यात आल्याशिवाय प्रकल्प सुरू करण्यात येणार नाही. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश संयुक्तरीत्या पूर्ण करत असलेल्या जामघाट प्रकल्पाबाबत सचिव तसेच मंत्री पातळीवर बैठक घेण्यात येईल अशी माहितीही तटकरे यांनी दिली.

पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आता नागपुरातच मिळणार
पूर्व विदर्भातील प्रकल्पांना प्रकल्प पूर्ण झाल्यावर आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाशिकला जावे लागत होते. हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंताला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासंबंधीचा निर्णय सरकार लवकरच घेईल, असे असे तटकरे यांनी बैठकीच्या वेळी सांगितले.