आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात चांगले कलाकार; प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - केवळ पुण्या-मुंबईतीलच लोक कलाकार होऊ शकतात असे नाही तर अगदी ग्रामीण चांगले कलाकार आहेत. केवळ त्या कलाकाराने चांगल्या गुरूकडे योग्य ती शिक्षा घेतल्यास आणि रियाज केल्यास तो चांगला गायक होऊ शकतो. परंतुु आजकाल मात्र या रिअ‍ॅलिटी शोमुळे अर्धपक्व कलाकार गीत गाणे सुरू करतो आणि त्याला लोक उचलून धरतात हे आश्चर्यच आहे. परंतु जेव्हा तोच कलाकार नवीन काही गातो तेव्हा तो उघडा पडतो एवढे मात्र खरे, असे विचार व्यक्त केले गझल गायक सुरेश वाडकर यांनी. ते येथील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

येथे वाडकर यांच्या स्वरसंध्या या गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वाडकर शहरात आले होते. ते म्हणाले, संगीतात गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व आहे. आम्हीही गुरू -शिष्य परंपरेत मोठे झालो आहोत, परंतु आता अर्धेकच्चे स्वत:ला गायक समजणारी मुले या क्षेत्रात उतरत आहेत. परंतु जे गायलेले आहे ते पुन्हा गाऊन काय फायदा? जेव्हा तुम्ही काही नवीन गाता तेव्हा तुमची खरी कुवत कळते. आज माझ्याकडे कितीतरी मुले शास्त्रीय संगीत गायन शिकण्यासाठी येतात. शास्त्रीय संगीत हे कधीच न संपणारे आहे. परंतु आताच्या या अवाजवी रिअ‍ॅलिटी शोमुळे ते कुठे तरी दुर्लक्षित झाल्यासारखे वाटते, अशीही खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.