आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surplus Teachers Job Safe, High Education Minister Vinod Tawade Said

अतिरिक्त शिक्षकांच्या नोक-या सुरक्षित, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील शाळांमधून अतिरिक्त ठरणा-या कोणत्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक तुकड्या बंद होणार असल्याने निम्म्या शिक्षकांची नोकरी धोक्यात आहे. मात्र, एकालाही बेरोजगार करणार नाही, असे तावडे म्हणाले. सर्व अतिरिक्त शिक्षकांचे अन्य विभागात समायोजन होईल. त्यासाठी शिक्षणसेवकाच्या अनुभवाचा प्राधान्यक्रमाचा निकष लावून प्रतीक्षा यादी केली जाईल, असे आश्वासनही तावडे यांनी सभागृहात दिले.

मेडिकल सीईटीत निगेटिव्ह गुण रद्द : वैद्यकीय प्रवेशाच्या सीईटीत निगेटिव्ह गुण देण्यात येणार नाही. ‘आयटीआय’च्या उत्तरपत्रिकेतील निगेटिव्ह गुण रद्द करण्याचा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने घेतला आहे. विद्यापीठ कायद्यात बदलाची प्रक्रिया सुरू आहे. हा कायदा बदलून लवकरच नवा विद्यापीठ कायदा लागू करू, अशी माहिती तावडे यांनी दिली.

महाविद्यालयात निवडणूका
तावडे म्हणाले की, यापुढे शिक्षण शुल्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. महाविद्यालयायीन जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून कुशल नेतृत्व तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे नव्या विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्यात येतील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

‘एनईईटीच्या सहभागावर पुनर्विचार
वैद्यकीयच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेत महाराष्ट्राचा सहभाग असल्याने मेडिकलच्या ३३० जागा इतर राज्यांसाठी खुल्या झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, या परीक्षेतून राज्याचा सहभाग वगळून ३३० जागा महाराष्ट्रासाठीच कशा खुल्या होतील, यावर विचारविनिमय सुरू असल्याचे तावडे म्हणाले.