आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspicions Confirmed, 23 Mobile Phones Recovered From Nagpur Jail

नागपूर जेलच्या झाडाझडतीत मोबाईल, शस्त्रांचा ओघ थांबेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पाच कुख्यात कैदी पळाल्यानंतर नागपूर कारागृह देशभरात चर्चेत आले. येथील ढिसाळ सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली असून कैद्यांना पुरवण्यात येणार्‍या ‘सुविधां’ची चिरफाड करण्यात येत आहे. नऊ दिवस उलटूनही कारागृहातील मोबाईल आणि शस्त्रांचा शोध थांबत नाही आहे. गुरुवारी कारागृहात एक स्मार्टफोन, तीन सीमकार्ड, दोन चार्जर, ९ बॅटरी, मल्टीकार्ड रिडर, नऊ कैची, नऊ रेजर, वस्तरा आणि इलेक्ट्रीकल सामानांची एक किट सापडली.