आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ताडाेबा’त दोन वाघांची झुंज, दीड वर्षाचा वाघ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चितळाच्या शिकारीवरून दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत दीड वर्षांचा एक वाघ ठार झाला. या घटनेमुळे वनखात्यात खळबळ उडाली आहे.

व्याघ्र प्रकल्पातील जांभुळबोडी क्षेत्रातील कक्ष क्र. १०७ मध्ये गस्तीवर असलेल्या वन कर्मचार्‍यांना दीड वर्षांचा पट्टेदार वाघ बुधवारी मृतावस्थेत आढळला. या वाघाच्या बाजूला एक चितळही मृतावस्थेत आढळल्याने िचतळाच्या शिकारीवरून दोन वाघांमध्ये झुंज होऊन एकाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वनाधिकार्‍यांनी काढला आहे. या पूर्वी १३ मे रोजी तळोधी येथे दोन वाघांच्या झुंजीत एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृत्यू झाला होता.
‘ताडोबा’चे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. मृत वाघाच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. तसेच घटना घडली त्या परिसरात वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसून आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...