आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 जागांसाठी 1,740 उमेदवारांची स्वारी; तलाठी भरतीसाठी शहरात आला बेरोजगारीचा पूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महसूल खात्यांतर्गत भरल्या जाणार्‍या तलाठ्यांच्या 18 जागांसाठी 1,740 उमेदवारांनी रविवारी परीक्षा दिली. बेरोजगारांची फौज दर्शवणारे चित्रच त्यानिमित्ताने शहरात दिसून आले.

गेल्या पंधरवड्यापर्यंत राबवण्यात आलेल्या आॅनलाइन प्रक्रियेंतर्गत 2,544 उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी 1,740 (68.39 टक्के) परीक्षार्थ्यांनीच हजेरी लावली. राज्यभर एकाचवेळी परीक्षा असल्यामुळे हा आकडा एवढा घसरला, असे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे.

शहरातील विविध आठ केंद्रांवरून दुपारी दोन ते साडेतीन या वेळात ही परीक्षा घेतली गेली. होलिक्रॉस कॉन्व्हेंट, डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन, गोल्डन कीडस् आदी केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
निकालही आॅनलाइनच
रविवारी दुपारी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता ‘आॅनलाइन’ घोषित करण्यात आला. उमेदवार इंटरनेटच्या मदतीने जाहीर झालेला निकाल पाहू शकणार आहेत.

छायाचित्र - शहरातील एका परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना तलाठी पदाचे दावेदार.