आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौथीच्‍या विद्यार्थिनीला शिक्षकानेच सांगितले कपडे काढायला, चंद्रपुरातील प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महिला अत्‍याचारवि‍रोधी कायद्यावर संसदेत चर्चाच सुरु आहे. परंतु, त्‍या कायद्याची भीती निर्माण झालेली दिसत नाही. अमृतसरमध्‍ये एका तरुणीवर धावत्‍या कारमध्‍ये सामुहिक बलात्‍कार करण्‍यात आला. तर महाराष्‍ट्रात एका शिक्षकानेच व्‍यवसायाला काळीमा फासला. चौथ्‍या इयत्तेमध्‍ये शिकणा-या विद्यार्थिनीला त्‍याने कपडे काढायला लावले. ती ओरडल्‍यानंतर इतर शिक्षक तिथे पोहोचले आणि पुढील अनर्थ टळला.

चंद्रपूर जिल्‍ह्यात गांगलवाडी गावातील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत हा प्रकार घडला. शाळेमध्‍ये मुख्‍याध्‍यापकांना निरोप समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रम झाल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांना अल्‍पोपहारासाठी थांबविण्‍यात आले होते. यादरम्‍यान, सुरेश बुराडे नावाच्‍या शिक्षकाने चौथीत शिकणा-या एका विद्यार्थिनीला शाळेच्‍या कार्यालयात बोलाविले. तिथे त्‍याने तिला कपडे काढायला सांगितले. हे ऐकून ती घाबरली आणि जोरात ओरडली. त्‍यामुळे इतर शिक्षक कार्यालयात पोहोचले. बुराडे दारुच्‍या नशेत होता. त्‍याच्‍याविरुद्ध ब्रह्मपुरीच्‍या पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.