आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1,535 शिक्षकांनी केले अवैध मतदान, ‘नोटा’ 107

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शैक्षणिकदृष्ट्या प्रगत समजल्या जाणार्‍या शिक्षकांची मतेही चुकतात, हे आजच्या मतमोजणीअंती स्पष्ट झाले आहे. 27 हजार 764 मतांमध्ये तब्बल 1,535 मतपत्रिका अवैध घोषित केल्या गेल्या. त्याचवेळी 107 शिक्षकांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. 20 जून रोजी झालेल्या मतदानात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील 27 हजार 764 मतदारांनी मताधिकाराचा वापर केला. त्यांपैकी ‘नोटा’ व अवैध मतपत्रिका वगळता 26 हजार 122 शिक्षकांनीच अचूक मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.

39 मतांचा घोळ
झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करताना विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे 27 हजार 803 मत पडल्याचे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी मोजल्या गेलेल्या मतपत्रिका 27 हजार 764 एवढ्याच होत्या. त्यामुळे 39 मते गेली कोठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. हा घोळ स्वीकार करताना मतदानाच्या दिवशीच्या आकड्यात गोंधळ झाला असावा, अशी शक्यता सहायक निवडणूक अधिकारी तथा उपायुक्त माधव चिमाजी यांनी व्यक्त केली.

13 हजार 62 मतांचा कोटा
झालेल्या मतदानात वैध मतांची संख्या 26 हजार 122 असल्यामुळे विजयासाठी 13 हजार 62 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. वैध मतांच्या निम्म्यापेक्षा एक मत अधिक असे कोट्याचे सूत्र आहे. त्यामुळे 13 हजार 62 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.