आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर जिल्ह्यात दरोडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दरोडा टाकण्याच्या हेतूने गावात शिरलेल्या दरोडेखोरांनी एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. कुसी तालुक्यातील नावरगाव येथे शुक्रवारी रात्री 8 ते 10 वाजे दरम्यान घडली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी कुसी तालुक्यातील नावरगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर सामु‍हिक बलात्कार केला. सर्व दरोडेखोर हे पारधी समाजाचे होते. ते गावात दरोडा टाकण्याच्या हेतूने आले होते. त्यांनी नावरगावातील काही नागरीकांना सुरुवातीला मारहाण केली होती. घटनेनंतर परिसरात नाकाबंदी लावण्यात आली असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज शर्मा यांनी सांगितले. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणीचे काम सुरु आहे.