आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकूरदासजी बंग यांचे निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते ठाकूरदासजी बंग (95) यांचे वृद्धापकाळाने रविवारी वर्धा येथे निधन झाले. प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे ते वडील होत. खादी आणि सर्वोदय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांनी भूमिहीनांसाठी भूदान चळवळीत सहभाग घेतला.

ठाकूरदासजी बंग यांनी अर्थशास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेत करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते आशीर्वाद घेण्यासाठी गांधीजींच्या आश्रमात गेले. तेव्हा गांधीजींनी त्यांना ‘अमेरिकेत जाऊ नकोस, ग्रामीण भागात जा,’ असा सल्ला दिला. या भेटीने त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांनी गावात राहून शेतक-यांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास
सुरू केला. अभय आणि अशोक बंग ही त्यांची दोन मुले त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत.