आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या मेहुण्याकडे ८१ ताेळे साेन्याची चाेरी, भरदिवसा घर फाेडून २३ लाख लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर कमलाकर ताेतडे यांच्या घरी शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरी झाली. या घरातून चाेरट्यांनी सुमारे ८१ तोळे साेने, दोन किलो चांदी आणि १ हजार डॉलर असा एकूण २३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

किशोर हे अापली पत्नी, मुलासह नागपुरातील रघुकमल अपार्टमेंट, पांडे ले-आऊट येथे राहतात. ते गडकरींच्या उद्याेग समूहातील पूर्ती सोलर कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. कंपनीच्या कामानिमित्त किशाेर बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ते रेल्वेने नागपुरात परतले. त्यांना घेण्यासाठी किशाेर यांच्या पत्नी रेल्वेस्टेशनवर गेल्या होत्या. त्यामुळे घरी काेणीच नव्हते. ही संधी साधून चाेरट्यांनी डल्ला मारला. किशोर व त्यांच्या पत्नी परतले तेव्हा त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे दिसून अाले. त्यांनी कपाट तपासले असता माैल्यवान दागिने चाेरीस गेल्याचे लक्षात अाले. या प्रकरणी पाेलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात अाला.

नव्या आयुक्तांना चाेरांची ‘सलामी’
गेल्या काही वर्षांत नागपुरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी सीअायडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. पी. यादव यांच्याकडे नागपूरच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली. शुक्रवारी त्यांनी पोलिस सहआयुक्त अनुपकुमार यांच्याकडून पदभारही स्वीकारला. त्याच दिवशी नागपुरी चोरांनी हायप्रोफाइल घरात चोरी करून अायुक्तांना ‘सलामी’ दिल्याची चर्चा हाेती.