आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात लाखांच्या आमिषापायी तिस-या विवाहाचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सात लाख रुपये व औरंगाबाद शहरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून तिसरा विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या औरंगाबादेतील एका मासे विक्री करणा-या व्यावसायिकास शनिवारी रात्री अकोला पोलिसांनी अटक केली. शामद पटेल (43) असे आरोपीचे नाव असून तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते.

अकोला येथील एका परिचित महिलेच्या मध्यस्थीने शामद पटेलने 19 वर्षीय मुलीशी विवाह करण्याचा घाट घातला होता. त्याचे या पूर्र्वी दोन विवाह झालेले आहेत. सदर तरुणीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचा फायदा घेत पटेलने तिच्या आईवडिलांना सात लाख रुपये आणि प्लॉट देण्याचे आमिष दाखवल्याने त्यांनी या विवाहाला संमती दिली. अकोल्यातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी तरुणीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आरोपीने विवाह केला. या आंतरधर्मीय विवाहाची शिवसेना, भाजप, विहिंप कार्यकर्त्यांना कुणकुण लागली. त्यांनी पोलिसांनाही
माहिती दिली.

दागिने घेताना अटक
नवविवाहित जोडपे शनिवारी अकोल्यातील एका सराफा दुकानात दागिने खरेदीसाठी गेल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. सराफाच्या दुकानातच सिव्हिललाइन पोलिसांनी शामद पटेल यास ताब्यात घेतले. या नाट्यमय घडामोडीनंतर शनिवारी रात्री उशिरा संबंधित तरुणीने शामद पटेलच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भादंविच्या कलम 366, 417 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याची इनोव्हा गाडी (एम एच 20 सी एल 5) जप्त केली आहे.