नागपूर - ‘तू नही सुधरेंगा नही क्या? तेरे दिन भर गए है, साले तुझे उडा देंगे' अशा शब्दांत सार्वजनिक उपक्रम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना
मोबाइलवरून अज्ञात व्यक्तीने धमकी दिली. या धमकीनंतर पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे घर आणि कुटुंबाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास शिंदे हे रविभवनातील
आपल्या कॉटेज क्रमांक १३ मध्ये बसले होते. त्या वेळी त्यांच्या मोबाइलवर एक अज्ञात क्रमांकावरून फोन आला. एरवी दहा क्रमांकाचा मोबाइल क्रमांक असतो, पण हा बारा आकडी क्रमांक होता. शिंदे यांनी फोन उचलताच समोरील व्यक्तीने त्यांना थेट शिवीगाळ सुरू केली. ‘तू नही सुधरेंगा नही क्या, तुझे हम देख लेंगे, असे समोरच्या व्यक्तीने शिंदेंना धमकावले. शिंदे यांनी मग, ‘तु कौन बोल रहा है,' असे विचारले. त्यावर,' तु सिर्फ सुनने का काम कर. तेरे दिन भर गए है, साले तुझे उडा देंगे', असे समोरची व्यक्ती म्हणाली.