नागपूर - उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशनासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही. एकूण २२ पैकी १२ ग्रंथ सुस्थितीत असून १० ग्रंथ पुन्हा प्रिंटिंगसाठी देण्यात आले आहेत. यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून तो कमी पडू दिला जाणार नाही, असे उत्तर तावडे यांनी विधान परिषदेत दिले.
आघाडी सरकारच्या काळात निधी असूनही तो पुरेसा वापरण्यात येत नव्हता. माजी मंत्री राजेश टोपेंच्या नेतृत्वाखालील जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत, जनार्दन चांदूरकर यांच्या समितीने त्याचा पाठपुरावा केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.