आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यात तीन शेतक-यांच्या आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या विदर्भातील शेतक -या च्या आत्महत्यांचे सत्र काही केला थांबायला तयार नाही. नापिकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतक -या नी आत्महत्या केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

राजुरा तालुक्यातील साखरी गावातील दिनकर नवरखेडे (47) याने बुधवारी विष घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याने शेतीसाठीसाठी स्थानिक सेवा सोसायटीकडून 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेड कशी करायची या विवंचनेत तो होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

दुसºया घटनेत चिमूर तालुक्यातील जवरा (बोडी) गावातील गजानन नीलकनाथ राऊत (35) या शेतकºयाने गुरुवारी सकाळी विष घेतले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू
शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिस-या घटनेत मूल तालुक्यातील चितेगाव येथील रघुनाथ गोहाणे यांनी गुरुवारी दुपारी आपल्या घरातच गळफास घेतला. गोहाणे यांनी दोन बॅँकांकडून 65 हजार रुपयांचे कृषी कर्ज घेतले होते. त्यांच्यासमोरही कर्ज फेडण्याचा यक्ष प्रश्न होता