आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through The Ambulance Naxals Getting Explosive Substance, Medicine

रुग्णवाहिकेतून नक्षलींना स्फोटके, औषधांचा पुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - बिहार, छत्तीसगडसह काही राज्यांत उच्छाद मांडणा-या नक्षलवाद्यांना सरकारी रुग्णवाहिकेतून शस्त्रसाठा व औषधे पुरवली जात असल्याचा खळबळजनक प्रकार पोलिसांच्या नाकेबंदीत शुक्रवारी उघडकीस आला. भामरागड तालुक्यात दुर्गम भागात ताडगाव मार्गावर अडवलेल्या रुग्णवाहिकेतून पोलिसांनी स्फोटके तसेच औषधे जप्त केली आहेत. शासकीय कर्मचारी असलेल्या चालकासह चौघांना अटक करण्यात आली.

आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिस माजी जि. प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र करपेंच्या मागावर आहेत. पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील नारगुंडा, हालवेर या दुर्गम भागात नक्षलींना शस्त्रे पुरवली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांनी तपास नाक्यांवर कसून तपासणी सुरू केली तेव्हा एका रुग्णवाहिकेत हा साठा सापडला.
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा चालक संजित कार्तिक चंद्रदास (47), तेंदूपत्ता मॅनेजर छनुलाल पांडुरंग शेंडे (55), तेंदूपत्ता मुनीम बाबूलाल बोपटे (36) व बंडोपंत मल्लेलवार यांचा खासगी वाहनचालक विवेक किरचाळ यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांसह जिल्हा परिषद सदस्य मल्लेलवार आणि डॉ. करपेविरुद्ध भारतीय स्फोटके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पकडलेल्या रुग्णवाहिकेतून 4 डिटोनेटर, 1 किलो जिलेटिन अशी स्फोटके तसेच ‘एके-47’ची 10 जिवंत काडतुसे, सरकारी औषधांनी भरलेला एक बॉक्स आणि पावसाळ्यात उपयोगी पडणा-या 8 ताडपत्र्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील नारगुंडा, हालवेर या दुर्गम भागात नक्षलींना शस्त्रे पुरवली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांनी तपास नाक्यांवर कसून तपासणी सुरू केली तेव्हा एका रुग्णवाहिकेत हा साठा सापडला.

गडचिरोली तालुक्यातील पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा चालक संजित कार्तिक चंद्रदास (47), तेंदूपत्ता मॅनेजर छनुलाल पांडुरंग शेंडे (55), तेंदूपत्ता मुनीम बाबूलाल बोपटे (36) व बंडोपंत मल्लेलवार यांचा खासगी वाहनचालक विवेक किरचाळ यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांसह जिल्हा परिषद सदस्य मल्लेलवार आणि डॉ. करपेविरुद्ध भारतीय स्फोटके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पकडलेल्या रुग्णवाहिकेतून 4 डिटोनेटर, 1 किलो जिलेटिन अशी स्फोटके तसेच ‘एके-47’ची 10 जिवंत काडतुसे, सरकारी औषधांनी भरलेला एक बॉक्स आणि पावसाळ्यात उपयोगी पडणा-या 8 ताडपत्र्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

माजी जि. प. अध्यक्षावर संशय
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे विद्यमान सदस्य बंडोपंत मल्लेलवार यांच्या सूचनेवरून हा शस्त्रसाठा पाठवला जात होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. मल्लेलवार तेंदूपत्त्याचे बडे कंत्राटदार आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. करपे यांना विश्वासात घेऊन हे काम फत्ते केले जाणार होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला.

मल्लेलवार-नक्षलवादी संबंध
दोन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या एका उपकमांडरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्याने मल्लेलवार यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा पर्दाफाश केला होता. मात्र, थेट पुरावे नसल्याने पोलिसांनी कारवाई केली नव्हती.