आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDARBHA: सरासरी 55% मतदान, गोळीबाराची घटना वगळता शांततेत मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भात सर्वत्र शांततेत मतदान होत आहे. पण गडचिरोलीतील एटापल्ली परिसरात मतपेटी घेऊन निवडणूक अधिका-यांची गाडीवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा यत्रंणांने चोख प्रत्त्युत्तर दिल्याने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. नक्षलवादी भागात पुरेशी सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन हल्ला करण्याचे नक्षलवाद्याचे मनसुबे आधीच उधळून लावले होते. तसेच मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशीच ठेवण्यात आली होती. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात नागरिकांनी नक्षलवादयांच्या धमक्यांना भीक न घालता मतदानाला प्रतिसाद दिला. त्यामुळे या मतदारसंघात सुमारे 54 ते 55 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबाराची एक घटना सोडल्यास विदर्भातील सर्व मतदारसंघात शांततेत मतदान झाल्याचे चित्र आहे.

सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील तिसर्‍या व महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला विदर्भात गुरुवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. विदर्भातील मतदारांत उत्साह असल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या सत्रात पहिल्या दोन तासांत लोक रांगा लावून मतदान करीत होते. त्यामुळे पहिल्या 4 तासांत दहाही मतदारसंघात सरासरी 25 ते 30 टक्केपर्यंत मतदान झाल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले होते. सकाळी 7 ते 10 या वेळेत ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यानंतर दुपारच्या सत्रात कडक उन्हातही विदर्भकारांनी मतदान करण्याला प्राधान्य दिले. दुपारी 1 वाजता गडचिरोलीत 44 टक्के मतदान झाले होते. दुपारी तीनपर्यंत हेच प्रमाण 60 टक्क्यांच्या घरात गेले. नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्यानंतरही गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील नागरिकांनी त्यांच्या धमक्यांना भीक न घालता मतदान केले.

विदर्भातील दहाही मतदारसंघांत होणार्‍या या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. पोलिसांची कडक सुरक्षा व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नक्षलप्रभावी भागात दुपारी तीनच्या आत मतदान करून घेण्याचे निवडणूक अधिका-यांनी निर्देश दिले होते. आज देशातील 91 मतदारसंघात मतदान असून, देशातील सर्वच नक्षलग्रस्त भागात एकाच दिवशी म्हणजे आजच मतदान होत झाले हे विशेष. त्यामुळे संवेदनशील भागात व मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला होता.

कोणत्या मतदारसंघात किती झाले मतदान

1) नागपूर- 5 पर्यंत 48 टक्के मतदान
2) अमरावती- 5 पर्यंत 54 टक्के मतदान
3) गडचिरोली- 5 पर्यंत 54 टक्के मतदान
4) यवतमाळ- 5 पर्यंत 50 टक्के मतदान
5) रामटेक- 5 पर्यंत 46 टक्के मतदान
6) अकोला- 5 पर्यंत 55 टक्के मतदान
7) भंडारा- 5 पर्यंत 59 टक्के मतदान
8) चंद्रपूर- 5 पर्यंत 51 टक्के मतदान
9) वर्धा- 5 पर्यंत 58 टक्के मतदान
10) बुलडाणा- 5 पर्यंत 51 टक्के मतदान
पुढील स्लाइडमध्ये, विदर्भातील मातब्बर लढती आणि प्रभाव टाकणारे मुद्दे ....